मुंबई | मुलांमध्ये किंवा दोन ग्रुपमध्ये झालेल्या हाणामाऱ्या, भांडणं नेमहीच पाहायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओत चार मुली डोमिनोजची डिलिव्हरी करणाऱ्या तरुणीला मारत असल्याचं दिसत आहे.
लेडी गँग नावाने प्रसिद्ध असलेल्या या मुलींची दादागिरी पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील इंदौरमधील असल्याचं बोललं जात आहे.
डोमिनोज गर्लला शनिवारी मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओत दोन मुलींनी पीडित तरुणीचे हात पकडल्याचं दिसत आहे आणि एक मुलगी पाठून पीडित तरुणीच्या डोक्यावर आणि पाठीवर दांड्याने मारत आहे.
चारही मुली तिच्याभोवती घोळका करून तिच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. मारहाणीमुळे पीडित तरुणी खाली पडते. त्यानंतरही चार जणींना तिची दया येत नाही. त्यापैकी एक जण दांडा उचलून पीडितेला मारहाण करताना दिसत आहे.
पीडित तरुणी स्वत:चा बचाव करत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर चार मुलींना अटक करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर
पुढील 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज्यपालांना ऑफर, म्हणाले…
“मुख्यमंत्री फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा बोलले नाहीत”
‘ग्लासात ग्लास 36 ग्लास…’; सदानंदरावांसाठी सुप्रिया सुळेंचा वटपौर्णिमा विशेष उखाणा