पुणे | कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) याा व्हेरियंटने देशात खळबळ माजवली आहे. अशात सर्वांच्याच चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ओमिक्रॉनची लागण होत असल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन आता आणखी वाढलं आहे.
कल्याण-डोंबिवलीत एकाला तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी जणांना 6 तर पुण्याला एकाला ओमिक्रॉन (Omicron) विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे पिंपरीतील सहापैकी तिघे जण 18 वर्षाखालील असून अन्य तिघांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले आहेत.
नायजेरिया देशातील लेगॉस शहरातील एक 44 वर्षीय महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी 24 नोव्हेंबर रोजी आपल्या 12 व 18 वर्षांच्या दोन मुलींसह पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. या तिघींच्या संपर्कात आल्याने महिलेचा भाऊ आणि त्याच्या दीड वर्ष आणि 7 वर्षाच्या दोन मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे
या सहा जणांच्या नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा आढळल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज सायंकाळी दिला.
नायजेरियाहून आलेल्या महिलेमध्ये सौम्य लक्षणे असून अन्य पाच जणांना कसलीही लक्षणे नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ट्रास्क फोर्सची दक्षिण आफ्रिकेतल्या तज्ज्ञांसोबत उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे.
Omicron चा फैलाव रोखण्यासाठी पुणे प्रशासन कामाला लागलंय. उद्यापासून पुण्यात टेस्टिंग (Testing) आणि ट्रेसिंगला (Trasing) सुरूवात करण्यात येणार आहे. तसेच बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश रूग्णालयांना देण्यात आले आहेत.
उद्यापासून प्रत्येक व्यक्तींच्या संपर्कातील मोहिमेला सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख भगवान पवार यांनी दिली आहे. तसेच ऑक्सिजन बेड, हॉस्पिटलमधील बेडसंदर्भात पुरेसं नियोजन तसेच ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही पवार यांनी सर्व रूग्णालय प्रशासनाला दिले आहेत.
पुणे शहरात 438 नागरिक परदेशातून नुकतेच परतले आहेत. त्यापैकी 370 नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370 पैकी 335 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे. आतापर्यंत 267 नागरिकांची RT-PCR करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, विमानतळावर आलेल्या प्रत्येक प्रवाश्याची आरटीपीसआर चाचणी केली जात आहे. तसेच आवश्यकता भासल्यास जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी सोबतच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“गिरीश कुबेर आपल्या पुस्तकातून शरद पवारांपेक्षा फडणवीस श्रेष्ठ असल्याचं मांडताना दिसतात”
Omicron चे रुग्ण आढळल्यानंतर पुणे प्रशासन लागलं कामाला; घेतला हा निर्णय
साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक!
मोठी बातमी! Omicron चा धसका; ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
Corona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर