सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, आता अरुण गवळीचं कनेक्शन समोर

नवी दिल्ली | पंजाबी सिंगर (Singer) सिद्धू मुसेवाला (Siddhu Moosewala) याची रविवारी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली होती. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली.

पुण्यातील दोन शूटरची नावं समोर आली आहेत. सिद्धू मुसेवालाची हत्या करणाऱ्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे. यामध्ये पुण्यातील दोन शूटरचाही समावेश असून संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी त्यांची नावं आहेत. आता या प्रकरणी आणखी एक कनेक्शन समोर आलं आहे.

पंजाब पोलिसांनी उलगडा केलेल्या या प्रकरणात 8 शार्प शूटर्सनी मिळुन मुसेवालाची हत्या केल्याचा कयास पोलिसांनी पुराव्यानुसार बांधला आहे.

संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याची माहिती समोर आली असून तो पुण्याचा रहिवासी आहे. 29 मे रोजी मुसेवालाच्या शूटिंगमध्येही त्याचा सहभाग होता.

गवळी सध्या महाराष्ट्रातील तुरुंगात आहे. या नव्या खुलाशानंतर पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी माहितीचं आदान-प्रदान केलं असून या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून पंजाब पोलिसांनी सहकार्यही मागितलं आहे.

मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते.

2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले, आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटिव्ही फूटेज पाहून संतोष जाधव याच्याबद्दल माहिती दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

Monsoon Update | येत्या 2 दिवसांत ‘या’ सहा जिल्ह्यांना पाऊस झोडपणार 

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी! 

“तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे…” 

“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान