रेल्वेने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल

नवी दिल्ली | रेल्वेने भंगारात काढलेल्या वस्तुंची विक्री करुन मोठं उत्पन्न मिळवलं आहे. मध्य रेल्वेने तब्बल
57 कोटी 29 लाखांचे भंगार विकल्याची माहिती समोर आली आहे.

2021 मध्ये देखील रेल्वेला 9 कोटी 21 लाखांचा महसूल मिळाला होता. यामुळे यंदा महसूलमध्ये भरघोस वाढ झाल्याचं दिसत आहे.

मोठ्या संख्येने गोळा केलेल्या स्क्रॅप पीएससी स्लीपरची उत्तर रेल्वेकडून विल्हेवाट लावली जात आहे, जेणेकरून रेल्वेची जमीन इतर कामांसाठी आणि महसूल उत्पन्नासाठी वापरता येईल. शून्य स्क्रॅप दर्जा प्राप्त करण्यासाठी उत्तर रेल्वे मिशन मोडमध्ये स्क्रॅपची विल्हेवाट लावण्यास तयार आहे.

रेल्वेच्या या उपक्रमाचं काैतुकही केलं जात आहे. कारण या उपक्रमामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी रेल्वेच्या उत्तर विभागाने भंगार विकून 227.71 कोटी रुपयांची कमाई केली होती. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत मिळवलेल्या 92.49 कोटी रुपयांच्या उत्पन्नापेक्षा हे 146% जास्त असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, आता अरुण गवळीचं कनेक्शन समोर 

Monsoon Update | येत्या 2 दिवसांत ‘या’ सहा जिल्ह्यांना पाऊस झोडपणार 

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी! 

“तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे…” 

“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”