Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर

मुंबई | मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ (Nicobar Islands) मान्सूनची प्रगती वेगानं होताना दिसत आहे.

26 मे रोजी केरळ (Kerala) तसंच अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली

महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व सरी लवकरच बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शनिवारी वर्धा येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली होती. तर महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी कमाल तापमान 29.7 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली

दरम्यान, देशातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे.  हा पहिला अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांचा नरेंद्र मोदींना गंभीर इशारा, म्हणाले… 

काँग्रेसचं मिशन 2024; राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय 

“…नाहीतर तुमचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते” 

जगाने आणखी एक दिग्गज गमावला; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

‘घरी आई वडील आहेत की नाही…’; केतकी चितळेला उद्धव ठाकरेंनी सुनावलं