“आम्ही जे केलं ते सुर्य उगवल्यानंतर केलं, सुर्य उगवण्याआधी आम्ही शपथ घेतली नाही”

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आम्ही लोकशाहीचा अपमान केला म्हणताय, पण आम्ही गुलामगिरी मोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. आम्ही जे केलं ते सुर्य उगवल्यानंतर केलं. सुर्य उगवण्याआधी आम्ही शपथ घेतली नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

मी पुन्हा पुन्हा सांगतो, मध्यंतरी ते अमित शहा पुण्यात येऊन गेले. एकट्याने लढण्याचे त्यांनी आवाहन केले. दसऱ्या मेळाव्यातच आम्ही आवाहन स्विकारलं होतं. आम्ही एकट्याने लढू विरासारखे लढू पण ही लढाई करत असताना तुम्ही तुमचे अधिकार वापरायचे नाही, आम्ही आमचे अधिकार वापरणार नाही. कार्यकर्ते-कार्यकर्ते म्हणून आणि पक्ष म्हणून लढा, मग बघू कोण सरस आहे, ते पाहून घेऊ. पण आव्हानं द्यायची आणि ईडीची पिडा लावायची, याला काही अर्थ नाही, याला शौर्य म्हटलं जात नाही, बाळासाहेबांनी काय उत्तर दिलं असतं हे सर्वांना माहिती आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

अकाली दल, ममता बॅनर्जी यांच्यासोबत युती केली. अटल बिहारी वाजपेयी यांनी सरकार स्थापन केले. काही करा पण भगवा उतरू देऊ नका, असं सांगितलं आहे. पण आता भगव्याचं रंग फुसट झालं आहे. हे नव हिंदूत्वावादी झाले आहे. हे हिंदुत्वाचा वापर करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

स्वत: च्या स्वार्थासाठी हिंदूत्वाचा वापर करत आहे. सत्ता पाहिजे म्हणून हिंदुत्त्वाशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मेहबूब मुफ्ती यांच्याशी युती, सत्ता पाहिजे म्हणून संघ मुक्त भारत करू म्हणवणाऱ्या नीतीश कुमारांशी युती, सत्ता पाहिजे म्हणून मोदी हटावे म्हणणारे चंद्राबाबू यांच्यासोबत युती केली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार घणाघात केला.

एक दिशा आणि एक दिशा म्हणायचे आता काय झालं. हिंदूत्व म्हणून काही राज्यात गौहत्या बंदी आणि मतांसाठी दुसऱ्या राज्यात गौ हत्या बंदी नाही. जर खरे मर्द असाल तर अगदी काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत चाला, असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

“…मग बघू कोण सरस ठरत ते”; उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना आव्हान 

 “मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे आणि तलवार जरी हातात नसली तरी…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

 निधनाच्या अफवांवर लता मंगेशकर यांनीच केलं ट्विट, म्हणाल्या…

  येत्या 2 दिवसात ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

  “…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती