कंगणाच्या ‘सीता’ चित्रपटात ‘हा’ सुपरस्टार दिसणार रावणाच्या भूमिकेत!

मुंबई | ‘द इनकारनेशन सीता’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका नेमकं कोण साकारतंय यावरून माध्यमांमध्ये अनेक चर्चा चालल्या. अशातच या चित्रपटात मुख्य भूमिका अभिनेत्री कंगणा राणावत साकारत असल्याचं नुकतंच स्पष्ट आहे.

द इनकारनेशन सीता या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी कंगणा राणावतच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. कंगणाने देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे. कंगणा या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे.

कंगणाबरोबरच या चित्रपटात महत्वाच्या असणाऱ्या लंकेश रावणाच्या भूमिकेत अभिनेता रणवीर सिंग दिसणार असल्याचं देखील समोर आलं आहे. नुकतंच फिल्मफेअरने याबद्दल वृत्त दिलं आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मे महिन्यात रणवीरला लंकेश रावणाच्या भूमिकेसाठी विचारलं होतं.

सध्या रणवीर आणि निर्मात्यांमध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. रणवीर सिंग देखील या चित्रपटासाठी फारच उत्सुक असल्याचं समजत आहे. तो निर्मात्यांच्या फायनल नरेशनची वाट पाहत आहे.

द इनकारनेशन सीता हा चित्रपट एक बीग बजेट चित्रपट आहे. बाहुबलीच्या सेटप्रमाणे या चित्रपटासाठी सेट वापरला जाणार आहे. यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

या चित्रपटाच्या डायलॉग आणि लिरिक्सचं लिखाण मनोज मुंतशीर यांनी केलं आहे. सलोनी शर्मा आणि अंशिता देसाई या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या अंगावर पडले होते किडे, परिस्थिती वाचून तुम्हालाही रडू कोसळेल

दिल्लीतील सिव्हिल डिफेन्सच्या जवानाला भररस्त्यात मारहाण…; पाहा व्हिडीओ

माकडासोबत फोटो काढायला गेला अन् घडला भयानक प्रकार; पाहा व्हिडीओ

…म्हणून करीना-दीपिका नव्हे तर कंगना करतेय ‘द इनकारनेशन सीता’मध्ये मुख्य भूमिका

‘…अन् रात्री झोपताना कोणीतरी माझा गळा दाबायचं’; हेमा मालिनींनी सांगितला भयाण किस्सा!