गाढ झोपलेल्या मुलाला उठवण्यासाठी हत्तीणीने लढवली ‘ही’ शक्कल, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर आजकाल अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये कधी-कधी प्राण्यांचे देखील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात विशेष करून जंगली प्राण्याचे व्हिडीओ जास्त प्रमाणात व्हायरल होत असतात.

अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीण आपल्या मुलाला झोपेतून उठवण्यासाठी काय-काय करते, हे पाहायला मिळतं आहे.

सुरूवातीला एका हत्तीणीच लहान पिल्लू हिरवळीवर गाढ झोपलं आहे. काही वेळानंतर त्या ठिकाणी त्या पिल्लाची आई म्हणजेच एक हत्तीण येते आणि तिच्या पिल्लाला उठवण्याचा प्रयत्न करते. परंतू काही केल्या ते हत्तीणीचं पिल्लू झोपेतून उठायचं नावच घेत नसल्याचं दिसून येतं आहे.

त्यानंतर हत्तीणीने आपल्या मुलाला झोपेतून उठवण्यासाठी एक युक्ती लढवली. ती हत्तीण त्या ठिकाणाहून निघून जाते आणि आपल्या केअर टेकरला त्या ठिकाणी घेऊन जाते. इशाऱ्याने ती हत्तीण त्यांना आपलं पिल्लू काही केल्या झोपेतून उठत नसल्याचं सांगते.

त्यानंतर एक केअर टेकर त्या हत्तीणीच्या पिल्लाजवळ जातो आणि त्याला आपल्या हतांनी उठवण्याचा प्रयत्न करतो. सुरूवातीला ते पिल्लू उठतच नाही. त्यानंतर केअर टेकर आणखिण प्रयत्न करतो. त्यानंतर काही वेळानंतर ते पिल्लू गाढ झोपेतून जागं होतं आणि त्या हात्तीणीपाशी जाऊन उभं राहतं.

हत्तीण आणि तिच्या पिल्लाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका यूजरने हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.

https://twitter.com/buitengebieden_/status/1438966385380663299?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1438966385380663299%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fmother-elephant-trying-to-wake-up-baby-failed-seek-help-from-caretaker-video-viral-mhpl-606291.html

महत्वाच्या बातम्या-

कंगणाच्या ‘सीता’ चित्रपटात ‘हा’ सुपरस्टार दिसणार रावणाच्या भूमिकेत!

वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या अंगावर पडले होते किडे, परिस्थिती वाचून तुम्हालाही रडू कोसळेल

दिल्लीतील सिव्हिल डिफेन्सच्या जवानाला भररस्त्यात मारहाण…; पाहा व्हिडीओ

माकडासोबत फोटो काढायला गेला अन् घडला भयानक प्रकार; पाहा व्हिडीओ

…म्हणून करीना-दीपिका नव्हे तर कंगना करतेय ‘द इनकारनेशन सीता’मध्ये मुख्य भूमिका