गोपीचंद पडळकरांची गाडी फोडली; भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

सांगली | भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर वारंवार ठाकरे सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. अशातच आता सांगलीमध्ये पडळकर गट आणि राष्ट्रवादी-शिवसेना गटात तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर येत आहे.

पडळकर गट आणि राष्ट्रवादी-शिवसेना गटात हा राडा झाला आहे. या राड्यामध्ये गोपीचंद पडळकर यांची गाडी फोडल्याची माहिती देखील समोर आली आहे.

सांगलीच्या आटपाडीमधील साठे चौकात पडळकर गट आणि राष्ट्रवादी-शिवसेना गट आमने सामने आले होते. त्यावेळी गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे.

दोन्ही गट आमने सामने आल्यानंतर दोन्ही गटाने जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळात चौकातलं वातावरण तापलं आणि दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.

शाब्दिक वादावादीनंतर दोन्ही गट आक्रमक झाले होते. त्यानंतर या वादावादीचं रूपांतर हाणीमारीत झालं. या प्रकरणात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

या सर्व प्रकरणात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचं देखील वृत्त आहे. तर एका कार्यकर्त्यांच्या पायाला देखील दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवाराची पळवा पळवी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून ही हाणामारी झाल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे सध्या आटपाडीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलीस परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत.

एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. एसटीचं सरकारी विभागात विलगीकरण व्हावं, अशी मागणी एसटी कर्मचारी करताना दिसत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला गोपीचंद पडळकर  यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताचं आव्हान संपुष्टात! टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर

“परमबीर सिंह यांना भाजपने गायब केलं, त्यांचं शेवटचं लोकेशन…”

“मला 24 तासांपैकी 2 तास उचक्या लागतात, माझं एवढं नाव घेतलं जातं”

…म्हणून अनिल देशमुखांची ईडीच्या कोठडीत रवानगी; आलं ‘हे’ कारण समोर

“…आता सामाजिक मंत्र्याचं सामाजिक भान हरवलंय”