सुशांत प्रकरणी आता अमित शहांनी देखील सोडलं मौन; महाराष्ट्र सरकारवर आरोप करत म्हणाले..

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. सुशांत प्रकरणी बॉलीवूड इंडस्ट्रीसह महाराष्ट्र सरकारवरही अनेकांवर आरोप करण्यात आले होते. सुशांत प्रकरणी आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मौन सोडलं आहे.

बिहारची निवडणूक आता अगदी थोड्या दिवसांवर येवून ठेपली आहे. बिहार निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा देखील मुळचा बिहार मधीलच आहे.त्यामुळे येत्या बिहार निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजप सुशांत सिंह राजपूतचच्या मुद्द्याचा वापर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर एका वृत्त वाहिनीने अमित शहा यांना प्रश्न विचारला होता.

येत्या बिहार निवडणुकीमध्ये सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असेल का?, असा प्रश्न अमित शहांना विचारण्यात आला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अमित सहा म्हणाले की, बिहार निवडणुकीत सुशांतचा मुद्दा किती मोठा असेल याबाबत मला माहित नाही. मात्र, सुशांत सिंह राजपूत प्रकरण अगोदरच जर सीबीआयकडे सोपविण्यात आलं असतं तर हा मुद्दाच तयार झाला नसता.

तसेच अमित शहा यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे. सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याबाबत ठाकरे सरकारनं उशीर केला, असा आरोप त्यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

सुशांत प्रकरणावरून या अगोदरही अनेक भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील अनेक भाजप नेत्यांनी अप्रत्यक्षपणे आरोप केले होते. आता अमित शहा यांनी सुशांत प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला आहे.

अमित शहा यांनी यावेळी अद्याप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट सर्वत्र असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांची लाट अद्याप देखील सर्वत्र आहे. याचा आम्हाला फायदा नक्कीच होईल. बिहार निवडणुकीनंतर बिहारमध्ये देखील भाजपचच सरकार स्थापन होईल, असा विश्वास अमित शहा यांनी दाखवला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीसह देशातील राजकारण देखील तापलं होतं. सुरुवातीला मुंबई आणि बिहार पोलीस सुशांत प्रकरणी तपास करत होते. मुंबई आणि बिहार पोलिसांच्यात सुशांत प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सीबीआय याप्रकरणी तपास करत आहे. तसेच एनसीबी आणि ईडी सारख्या देशातील उच्च दर्जाच्या एजन्सी देखील याप्रकरणी शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘केबीसी’तील अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ प्रसिध्द डायलॉग कोणी लिहिला आहे? वाचा सविस्तर

कौतुकास्पद! या जोडप्यानं लग्न खर्च वाचवून तब्बल 500 श्वानांना केली ‘अशी’ मदत

काय सांगता! कोरोनाकाळात तब्बल ‘एवढ्या’ सायकली विकल्या गेल्या

बिहारच्या गरजू मुलींना सॅनिटरी पॅड मिळावं म्हणून युवतींनी मिळून केलं ‘हे’ काम

आयपीएल मधील धोनीचा ‘तो’ विक्रम मोडीत काढत विराटनं रचला नवा इतिहास