मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या काहीच अलबेल नसल्याच्या चर्चा घुमत आहे. अनेक दिवसांपासून या चर्चा सुरु असून आता हे समोरही येऊ लागलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे. नेत्यांची नाराजी समोर येत असून आघाडी सरकार पडणार असल्याच्या चर्चा आहे.
आघाडी सरकारमध्ये काही सुरळीत नसल्याच्या चर्चां असताना आता काँग्रेसच्या 25 ते 28 आमदारांनीही नाराजीचा सूर पकडला आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार स्वपक्षाच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. या नाराज आमदारांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीना पत्र लिहिलं आहे.
महामंडळ आणि दंडाधिकारी यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, जिल्हा समित्या बनवल्या नाहीत, त्यामुळे अडीच वर्ष वाया गेल्याची भावना आमदारांमध्ये आहे.
आमच्या समस्या, तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं काॅंग्रेस आमदारांनी पत्रातून सोनिया गांधींना सांगतिलं आहे.
महाविकास आघाडीमधील मंत्री विशेषतः काँग्रेस पक्षाचे मंत्री समस्यांकडे कानाडोळा करत असून तुम्हीच आता यामध्ये लक्ष घाला, असं या 25 ते 28 आमदांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आता महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद बाहेर येत आहेत. त्यामुळे आता सोनिया गांधी यावर काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात
“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”
“भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”
1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार?; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय