Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं

नवी दिल्ली | जग सध्या एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहे. रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukrain War) आणि कोरोना (Corona) या दोन्हींचा परिणाम जगावर होत आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरू होऊन आता महिना होत आला असला तरी युद्ध थांबवण्यात कोणत्याही देशाला यश आलेलं नाही. दिवसेंदिवस हे युद्ध अधिक भयानक रूप घेत आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सैन्याला कसल्याही परिस्थितीत युक्रेनवर ताबा मिळवण्याचे आदेेश दिले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणात रशियन सैन्याची हानी होत आहे. चेल्सी फुटबाॅल क्लबचे मालक रोमन अब्रामोचिव यांनी पुतिन यांना झेलेंस्की याचं एक पत्र दिलं आहे.

हे पत्र वाचताना पुतिन चांगलेच भडकले होते. युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन, झेलेंस्की यांनी आमच्या सर्व अटी मान्य कराव्या अन्यथा परिणाम वाईट होतील, असंही पुतिन म्हणाले आहेत.

युक्रेनच्या सैन्य शक्तीचा पाडाव करण्यात आमच्या सैनिकांनी यश मिळवलं आहे. आता आम्ही आमच्या पुर्ण ताकतीनं युक्रेनवर हल्ला करणार आहोत, असं रशियाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

रशिया सध्यातरी आण्विक हल्ल्याचा विचार करत नाही मात्र रशियाच्या अस्तित्वाला काही धोका असल्यास आम्ही याबाबत विचार करू, असंही रशियन सुरक्षा विभागानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध मिटवण्यासाठी जगातील अनेक देश पुढाकार घेत आहेत. पण व्लादिमीर पुतिन युक्रेनच्या शरणागतीवर ठाम आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”

  “भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…” 

  1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार?; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय