भर लग्न मंडपात तरूणीने नवरदेवाला चांगलाच बदडला, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | कोरोना रोगाच्या काळात बऱ्याच मुला-मुलींचे लग्नाचे बार उडले आहेत. हल्ली सोशल मीडियावरही अनेक प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ, तर खूपच मजेशीर असतात. तर काही खूपच धक्कादायक असतात.

आपल्याला माहित आहे लग्न म्हटलं की, नाच गाणं हे आलंच. आता यासोबतच अनेक वेगवेगळ्या रिती परंपराही माणसाने नव्यानं शोधून काढल्या आहेत. त्यातील काही तर खूपच चकित करणाऱ्या असतात. लग्न सोहळ्यात नवरा-नवरीचे फोटो काढणे, त्यांमधील प्रत्येक विधी करतानाचा त्या दोघांचा व्हिडीओ शूटींग काढणे हे होतं.

परंतू आता लग्नाच्या आधीच नवरा-नवरी गळ्यात-गळे घालून फोटो काढताना दिसत आहेत. नुसते फोटोच काढत नाहीतर ते फोटो सोशल मीडियावरही पोस्ट केले जातात.

तसेच आपल्याला हेही माहितच असेल की, लग्न म्हटलं की आणखिण एक गोष्ट येते. ती म्हणजे रूसवे फुगवे. कोणाला लग्नात मान मिळाला नाही त्यावरून काहीजण रूसतात. तर कोणी लग्नात जेवण चांगल नसल्यानं. परंतू काय तुम्ही याआधी या सगळ्याचा राग नवरदेवावर काढल्याचं पाहिलं आहे का?

नसेल पाहिलं, तर आता पाहू शकता. याच संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भर लग्न मंडपात एक तरूणी नवरदेवाला त्याचाच लग्नात मारत आहे. हे सगळं सरु असताना चक्क नवरदेवाची होणारी बायको म्हणजेच त्या दिवशीची नवरी पाहतच उभी आहे.

लग्न मंडपाच्या स्टेजवर नवरा-नवरीसह अनेक त्यांचे मित्रमंडळी उभे आहेत. त्या ठिकाणी अचानक एक तरूणी येते आणि नवरदेवाची सगळ्यांसमोर कॉलर पकडते आणि त्याला मारायला सुरूवात करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

तरूणी नवरदेवाला आपल्या हाताने पुढे ओढत आहे. तर नवदेवाचा एक मित्र त्याला मागच्या बाजून खेचत आहे. हे सुरू असताना त्या ठिकाणी असलेल्या काही महिलाही त्या तरूणीला मागे ओढत आहेत. परंतू तरूणी कोणालाही ऐकत नसल्याचंही व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘ऑफिशिअल निरंजन’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला जवळजवळ दोन हजार लोकांनी लोईक केलं आहे. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जणांना हा प्रश्न पडला आहे, की ती तरूणी त्या नवरदेवाला कोणत्या कारणासाठी मारत आहे.

https://www.instagram.com/reel/CScGAz7pH6p/?utm_source=ig_embed&ig_rid=829b2715-b2c5-4406-82e1-30d2ce292949

महत्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! स्वत:चं लग्न सोडून चक्क नवरी गेली बर्गर खायला,पाहा व्हिडीओ

‘एक बार मेने थोडीसी पिली बेहोश मे हो गई’; म्हणत तरूणीचा डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

महिला रिपोर्टरचा ‘हा’ प्रश्न ऐकून जोर-जोरात हसू लागले तालीबानी,पाहा व्हिडीओ

नोरा आणि टेरेन्सचा मंचावरच रोमान्स, व्हिडीओ व्हायरल