धाडस करत चक्क तरूणीने पकडला भला मोठा साप; होतयं सोशल मीडियावर कौतुक, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच प्रेरणा देणारे असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात.

आपल्याला माहित असेल की, हल्ली लोक खूप घाबरट झाली आहेत. आपला जीव हा प्रत्येकालाच प्रिय झालेला आहे. एखादा प्राणी समोर आला तर सगळ्यांची पळता-भुई होऊन जाते. काही लोकतर यामध्ये हद्दच करतात. एका लहानशा झुरळलालाही घाबरतात आणि आहे त्या जागेवरून पळतच सुटतात.

यामध्ये पहिला नंबत जास्त करून मुलींचाच लागतो. मूल तशी त्या मानाने घाबरट नसतात. परंतू याच मतांना बदलेल असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याआधी तुम्ही कधी एका तरूणीला साप पकडताना पाहिलं आहे का?, नसेल पाहिलं तर आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. या व्हिडीओमध्ये चक्क एक तरूणी भल्या मोठ्या सापाला आपल्या हाताने पकडतं आहे. ती ज्या प्रकारे तो साप पकडत असताना तिच्या तोंडावर कोणत्याही प्रकारची भिती नसल्याचं दिसून येतं आहे.

एका पार्कमध्ये एक काळ्या रंगाचा मोठा साप आला आहे. त्या सापाला पकडण्यासाठी त्या गार्डनचा केअर टेकर आपल्या हातात असलेल्या स्टिकने पकडत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे. परंतू काही वेळानंतर तो साप त्या स्टिकमधून निसटून जातो.

तितक्यात त्या ठिकाणी एक तरूणी येते आणि मनात कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता त्या सापाला आपल्या हातात पकडते. आपल्या डाव्या हातात ती त्या सापाला पकडते आणि घेऊन पुढे चालायला लागते. त्या पार्कच्या जवळच एका तलावाजवळ जाते आणि त्या सापाला त्यामध्ये सोडते.

व्हिडीओमधील तरूणीने दाखवलेल्या धाडसाचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. तसेच सोशल मीडियावरही या तरूणीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘Fts OMG videos’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे.

हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ लोकांनी पाहिला असून, या व्हिडीओला अनेक लोकांनी कमेंट्स देखील केल्या असल्याचं समजतं आहे.

https://twitter.com/Ffs_OMG/status/1427362309664542720?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1427362309664542720%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fviral-video-brave-girl-caught-big-snake-and-release-in-lake-watch-gh-593975.html

महत्वाच्या बातम्या-

भर लग्न मंडपात तरूणीने नवरदेवाला चांगलाच बदडला, पाहा व्हायरल व्हिडीओ

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! स्वत:चं लग्न सोडून चक्क नवरी गेली बर्गर खायला,पाहा व्हिडीओ

‘एक बार मेने थोडीसी पिली बेहोश मे हो गई’; म्हणत तरूणीचा डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ

महिला रिपोर्टरचा ‘हा’ प्रश्न ऐकून जोर-जोरात हसू लागले तालीबानी,पाहा व्हिडीओ