झटपट वजन कमी करायचंय? मग अंड्यांसोबत आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

मुंबई | डाॅक्टरांच्या वेगवेगळ्या रिपोर्टमधून, वेगवेगळ्या संशोधनामधून वारंवार आरोग्याच्या आणि खासकरून वजन वाढीच्या समस्या पुढे आल्या आहेत.

वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेकजण विविध उपाय करत असतात. जेवणावर नियंत्रण ठेवणे, प्रोटीन्स घेणे हे उपाय देखील केले जातात.

मिनरल्स, विटामिन्स, मिल्सचा भरपूर समावेश असणारी अंडी ही वजन कमी करण्यासाठी उपयोगात येतात. परिणामी अंडी खाणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.

अंड्यासोबतच जेवणात काही पालेभाजी आणि इतर पदार्थांचा समावेश केल्यास वजन घटण्यास मदत होते. इतर पदार्थांमुळं वजन लवकर घटतं.

पालक आणि अंडी सोबत खाल्ल्यानं वजन घटण्याची प्रक्रिया वेगवान होते. पालकमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असल्यानं पालकचा उपयोग वजन घटवण्यासाठी होतो.

नारळ तेलाचा खाण्यात उपयोग करत असाल तर वजन घटवण्यात मदत होईल. अंडा ऑम्लेट करत असताना नारळाच्या तेलाचा उपयोग करा वजन झपाट्यानं घटेल.

अभ्यासानूसार हे सिद्ध झालं आहे की, दररोज दोन चमचे नारळाचं तेल सेवन केल्यानं एका महिन्यात भरपूर वजन घटते. परिणामी अनेकजण सध्या नारळाच्या तेलाचा उपयोग करत आहेत.

ओटमील आणि अंडी सोबत खाल्ल्यानं वजन घटण्यास मदत होते. न्युट्रिएंट्सचा प्रमुख स्त्रोत म्हणून देखील अंडी ओळखली जातात. त्याबरोबर दररोज व्यायाम करणं देखील गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“2 वर्षात तब्बल 19 लाख EVM गायब”, शशी थरूर यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

 Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”