Ranbir Kapoor Alia Bhatt: लग्नाच्या चर्चेवर खुद्द रणबीरने केला मोठा खुलासा, म्हणाला…

मुंबई | अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या दर्दी अभिनयामुळे नेहमी चर्चेत असतो. रणबीर कपूरला फिल्म इंडस्ट्रीचा चाॅकलेट बाॅय म्हणून देखील ओळखलं जातं.

मागील अनेक दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. रणबीर आणि आलिया फिल्म इंडस्ट्रीचे हाॅट कपल (Ranbir Kapoor Alia Bhatt) म्हणून ओळखले जातं. अनेक कार्यकर्मात या दोघांनी एकत्रित हजेरी लावतात.

लहानपणापासून मित्र असलेले रणबीर आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रणबीर आलियाच्या लग्नाच्या तारखा सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

त्यावर आता रणबीरने एका मुलाखतीत लग्नाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य केलं आहे. मला वेड्या कुत्र्याने चावा घेतला नाही की मी मीडियाला तारीख जाहीर करावी, असं रणबीर म्हणाला आहे.

मी हे नक्की सांगू शकतो, की मी आणि आलिया दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहोत. आशा आहे की ते लवकरच होईल, असं रणबीर म्हणाला आहे.

या मुलाखतीत रणबीरने तारीख सांगण्यास देखील नकार दिला आहे. त्याचबरोबर दोघांच्या घरच्यांनी देखील गप्प बसणं पसंत केलं आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता देखील वाढली आहे.

दरम्यान, रणबीरच्या चाहत्यांना त्याच्या आगामी ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटांची उत्सुकता आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन, आलिया भट, नागार्जुन, डिंपल कपा़डिया यांचा दमदार अभिनय पहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रात्री झोपल्यावर ‘या’ कारणामुळे वाढतोय पुरुषांच्या जीवाला धोका; धक्कादायक माहिती समोर

 “90% आमदार नाराज, ऐनवेळी शिवसेना-काँग्रेसचे आमदार फोडण्याचा डाव”

काळजी घ्या रे…! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीव गेला

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

 नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात