मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून सर्वांना कोरोना महामारीनं घेरलेलं आहे. सर्वांच्या आयुष्यात कोरोनानं धुमाकुळ घातला आहे. अशात हे संकट काहीसं कमी झाल्यासारखं वाटत असताना धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये चीन, युरोपीयन देशांमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं होतं. पण आता भारतात देखील कोरोना आकडेवारीत वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे तब्बल 311 नवे रूग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे मुंबई विभागातील आहेत. परिणामी सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे.
20 मे रोजी एकट्या मुंबईत 231 नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे. नव्या कोरोना रूग्णांमुळे राज्यातील रुग्णांची संख्या 78,82,169 झाली आहे.
मृत्यूची नोंद नसल्याने अर्थात जीवितहानी न झाल्याने मृतांची संख्या 1,47,856 वर कायम आहे. परिणामी सध्या आरोग्य यंत्रणा देखील कामाला लागली आहे.
गेल्या 24 तासांत 270 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 1761 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 77,32,552 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.
दरम्यान, इतक्या प्रमाणात कोरोना रूग्णसंख्या आढळत असल्यानं राज्याचा आरोग्य विभाग दक्षता घेत आहे. त्यामुळे परत एकदा मास्क सक्ती होण्याची देखील शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ
‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार