मुंबई | राज्याचे मंत्री आणि सध्या ईडीच्या अटकेत असलेले नवाब मलिक यांचे पाय अवैध मालमत्ता व्यवहार प्रकरणात आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता व्यवहारांमध्ये हस्तक्षेपाच्या कारणामुळं देशभरात सध्या नवाब मलिकांचं नाव गाजत आहे.
सक्तवसूली संचलनालयानं मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता ईडीच्या आरोपपत्राची दखल मुंबईच्या विशेष न्यायालयानं घेतली आहे.
नवाब मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते, त्यामुळे सकृतदर्शनी पुरावे दिसत आहेत. त्यामुळं हा खटला पुढं चालू ठेवण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
मलिकांचा या प्रकरणात खास सहभाग होता हे प्राथमिक तपासात दिसत आहे. 21 एप्रिल 2022 रोजी ईडीनं मलिकांच्या विरोधात कारवाई केली होती.
कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी नवाब मलिक, दाऊदची बहिण हसिना पारकर आणि तिचा बाॅडिगार्ड सलिम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्याचं देखील निदर्शनास आलं आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आरोपपत्राची दखल घेतली आहे. गोवावाला कंपाऊंड प्रकरण मलिकांना चांगलंच भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ
‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार