फडणवीसांच्या अडचणींत वाढ; नवाब मलिकांच्या मुलीच्या गौप्यस्फोटानं खळबळ

मुंबई | राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलाच कलगितुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे.

राज्याचं राजकीय वातावरण पेटलेलं असताना देवेंद्र फडणवीसांच्या पेन ड्राइव्ह बॉम्बनं खळबळ माजवली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या या बाॅम्बनं खळबळ माजवली. दाऊदची माणसं वक्फ बोर्डात नियुक्त करण्यात आली आहेत. या दोघांमधील संवाद समोर आला आहे, असा दावा फडणवीसांनी केला.

आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक शेख यांनी ट्विट करत एक गौप्यस्फोट केला आहे.

फडणवीस यांनी दाऊद गँगचा संबंध असल्याचा केलेला आरोप मुदाससीर यांची नियुक्ती फडणवीस सरकारच्या काळात झाली होती, असं त्यांनी ट्विट केलं आहे. वक्फ बोर्डावर नियुक्ती ही 2019 नोव्हेंबरमध्ये झाली होती, अशा आशयाचं ट्विट सना मलिक यांनी केलं आहे.

ट्विटसोबत त्यांनी फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं.

दरम्यान, फडणवीसांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्ह बाॅम्बची चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. असं असतानाचा आता सना मलिक यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

सना मलिक यांच्या खुलास्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळणार आहे. त्यामुळे आता पुढे याप्रकरणी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “हिंमत असेल तर माझ्याशी लढा अन् युक्रेनला…”, Elon Muskचं पुतिनला ओपन चॅलेंज!

Russia Ukraine War: रशियाने दिली भारताला मोठी ऑफर, मोदी सरकारच्या निर्णयावर जगाचं लक्ष लागलं!

‘CBI नाही तर CID चौकशी करणार’, गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपचा सभात्याग

 …अन् भर सभागृहात धनंजय मुंडेंनी थोपटले दंड; पाहा व्हिडीओ

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेने घेतला मोठा निर्णय