भाजपचा ‘हा’ बडा नेता मुंबई पोलिसांच्या रडारवर; अटकेची टांगती तलवार कायम

मुंबई | मुंबईच्या राजकारणातील मातब्बर नाव भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्या मागावर आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये गणेश नाईक यांच्याविरोधात दोन महिलांनी तक्रारी नोंदवल्या होत्या. परिणामी नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिपा चौहान या महिलेनं नाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली  होती. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती.

चाकणकर यांनी गणेश नाईक यांच्या अटकेच्या कारवाईचे निर्देश दिले होते. मुंबई पोलिसांनी गणेश नाईक यांचं घर, कार्यालय आणि मुरबाडमधील फार्महाऊस येथे चौकशी केली आहे.

सध्या नाईक यांच्याविरोधात सीबीडी बेळापूर आणि नेरूळ पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलेनं पोलीस संरक्षणाची मागणी देखील केली आहे.

गणेश नाईक यांच्यासोबत आपण गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, असा गौप्यस्फोट महिलेनं केल्यानंतर राज्यात राजकारण पेटलं आहे.

गणेश नाईक नवी मुंबई भागातील भाजपचे दिग्गज नेते मानले जातात. येत्या महापालिका निवडणुकीत नाईक यांच्या खांद्यावर महापालिका निवडणुकीची जबाबदारी असताना हे प्रकरण बाहेर आल्यानं भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, मुंबई पोलीस पथकाच्या माध्यमातून नाईकांचा शोध घेत आहेत. गणेश नाईक यांच्याकडून बचावासाठी काय पावले उचलली जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 चेहऱ्यावर स्मित हास्य अन् डोळ्यात पाणी; हवाई सुंदरीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

“दादागिरी केली असती तर 35 वर्षे राजकारणात टिकलो नसतो”

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचं निधन!

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ 

“देशातील चित्र बदलेल, इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता हे विसरू नका”