हनी सिंगच्या अडचणींत वाढ; घरगुती हिंसाचार प्रकरणी न्यायालयानं फटकारलं, म्हणाले…

मुंबई | बॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग नेहमीच त्याच्या गाण्यांमुळे आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो. सध्या तो त्याच्या पत्नीनं केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. यो यो हनी सिंग विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची पत्नी शालिनी तलवार हिनं हनी सिंगच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे. 

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गायक हनी सिंग यांच्याविरुद्ध पत्नीच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये कोर्टात हजर न झाल्यानं दिल्लीच्या न्यायालयानं हनी सिंगला जोरदार फटकारलं आहे.

‘कायद्यापेक्षा मोठं कोणीच नाही’, अशा शब्दांत दिल्लीच्या स्थानिक न्यायालयानं गायक यो यो हनी सिंगला फटकारलं. अनुपस्थितीत राहिल्याप्रकरणी त्याची तब्बेत ठीक नसल्याचं कारण त्याच्या वकिलांनी दिलं. तसंच कोर्टाला आश्वासन दिलं की पुढील सुनावणीच्या वेळी तो तारखेला हजर होईल.

शालिनीनं आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, हनीने गेल्या 10 वर्षांत तिचा शारीरिक छळ केला होता. तसेच सिंह यांनी आपली फसवणूक केल्याचंही सांगितलं. शालिनी सिंगच्या याचिकेवर दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हनी सिंगच्या विरोधात नोटीस जारी करुन 28 ऑगस्टपर्यंत पत्नीनं लावलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्यास बजावलं होतं. मात्र तो अनुपस्थित होता.

यो यो हनी सिंगची पत्नी शालिनीनं त्याच्याविरोधात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयानं हनी सिंगला नोटीस पाठवली असून त्याच्याकडून याविषयी उत्तर मागितलं आहे.

शालिनीनं याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं कौटुंबिक हिंसाचाराचं प्रकरण असल्यामुळे हनी सिंह स्वतःच्या आणि पत्नीच्या संयुक्त मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे निर्देश दिले आहेत.

न्यायासाठी याचना करत हनी सिंगची पत्नी शालिनीला अश्रू अनावर झाले. शालिनीची अवस्था पाहून न्यायालयानं देखील तिच्या मानसिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. माझ्याकडे पर्याय नाही. मी माझ्या आयुष्याची 10 वर्षे हनी सिंगची सोबत राहिली आहे. मी सर्व काही सोडून त्याच्या पाठीशी उभी राहिले. आता त्यानं मला सोडलं आहे, असं सांगताना शालिनीला रडू कोसळलं आहे.

आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सर्व प्रकारामुळे हनी सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होणार असं चित्र दिसतंय.

महत्वाच्या बातम्या –

भावाच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडलं होतं? ऋषी कपूर यांच्या भावाने केला खुलासा

…म्हणून भरमंडपात नवरदेवासमोरच नवरीने मामासोबत घेतले फेरे; व्हिडीओ व्हायरल

लग्नानंतर सात महिन्याने वरूण धवनने केला मोठा खुलासा, म्हणाला…

ऐकावं ते नवलंच! मोबाईलच्या नादात भररस्त्यात आई बाळाला विसरली अन्…; पाहा व्हिडीओ

‘चुक केली पण…’, शिल्पाच्या पोस्टनं वेधलं अनेकांचं लक्ष