मुंबई । तुम्हाला जर सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आजच्या व्यापारी आठवड्यातील सोने व चांदीचा दर तुम्ही जाणून घ्यायला हवेत.
आज सोन्याच्या दरात थोडी वाढ झालेली आहे आणि चांदीच्य दरात मात्र थोडी घसरण आहे. त्यामुळे आज खरेदीसाठी चांगली संधी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीत सुधार होत असताना आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 4966 रुपये इतकी आहे.
100 ग्रॅम सोन्याचा दर 4,96,600 इतका आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, चांदी 61,400 रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे. तर आज चांदीचा दर 180 रुपयांनी घसरुन 61430 रुपये प्रती किलो झाला आहे.
उत्पादन शुल्क, राज्यातील कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतामध्ये बदलत असतात.
दरम्यान, कोरोना काळातही सोन्याचे दर वाढत असल्यानं 2021 मध्ये भारतात सोन्याचा व्यापार 797.3 टन इतका झाल्याचं समोर आलं आहे.
या नव्या वर्षात सुध्दा सोन्याची मागणी अशीच कायम राहण्याची आशा आहे. गोल्ड डिमांड ट्रेंड 2021 अहवालात सांगितलं की, 2020 च्या तुलनेत सोन्याच्या मागणीमध्ये 78.6 वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गोळीबाळानंतर ओवेसींच्या सुरक्षेत वाढ, आता देणार Z सेक्युरिटी
मोठी बातमी! बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी अडचणीत; ईडीनं केली ‘ही’ मोठी कारवाई
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?; वाचा आजचे ताजे दर
‘जर माझं चुकलं असेल तर….’; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बंडातात्यांनी मागितली माफी