फेडररला झुंजवणाऱ्या सुमितच किंग कोहलीकडून विशेष कौतुक

न्यूयाॅर्क : भारताच्या सुमित नागल याने पाच वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या स्वित्झल‌ॅंडच्या राॅजर फेडररला विजयासाठी चांगलेच झुंजावे लावले. सुमितने त्याच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेला बहारदार सुरूवात केली. या सामन्यात सुमितच्या लढाऊवृत्तीचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. त्याबरोबरच विराट कोहलीनेसुद्धा सुमितचे कौतुक केले आहे. 

विराट कोहलीने निराळ्या शैलीत कौतुक केलं आहे. विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुमितचा एक व्हिडीओ आणि एक फोटो पोस्ट केला. त्या व्हिडीओमध्ये त्याने फेडररविरूद्ध सुमितने पहिला सेट जिंकल्याचा क्षण बंदिस्त केला आहे. सलामीच्या सेटमध्ये फेडररला 4-6 अशी धूळ चारली.

सुमितमे पहिला सेट जिंकल्यानंतर साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. फेडररसारख्या खेळाडूसोबत पहिल्याच सामन्यात पहिला सेट जिंकणे हे खूप मोठी बाब होती. त्यामुळे तो साऱ्यांच्याच चर्चेचा विषय बनला.

दुसऱ्या सेटपासून मात्र फेडररने आपला दमदार खेळ दाखवून दिला. त्याने दुसरा सेट 6-1 असा जिंकत जोरदार पुनरागमन केले. त्या सेटमध्ये सुमितला फारसा प्रतिकार करता आला नाही.

तिसऱ्या सेटमध्येही फेडररने आपला जलवा दाखवत 6-2 असा सेट खि्शात घातला आणि सामन्यात आघाडी घेतली. पण पुन्हा सुमितने चौथ्या सेटमध्ये 6-4 मात्र सुमितने फेडररला कडवे आव्हान दिले.

फेडरर सहज विजय मिळवेल असे वाटत असताना सुमितने फेडररला चांगलेच झुंजवले. पण अखेर भारताच्या सुमितला पराभवाचा सामना करावा लागला. 

 

महत्वाच्या बातम्या-