विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या आंदोलनाला यश; मिळालं ‘हे’ आश्वासन!

मुंबई : गेल्या 18 दिवसांपासून विनाआनुदानित शाळांचे शिक्षक मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत होते. यामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ माहाविद्यालयाचे शिक्षक सहभागी झाले होते. काही जणांनी अन्नपाण्याचा त्यागही केला होता. पगार द्या ही एकच मागणी शिक्षकांची होती. आता विनाआनुदानित शाळांच्या शिक्षकांना थोडासा दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.विनाआनुदानित शाळा, महाविद्यालयांच्या अनुदानात 20 टक्के वाढ होणार आहे, अशी माहीती समोर आली आहे. 

ज्या शाळांना कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळत नव्हतं त्यांना 20 टक्के अनुदान, तर ज्या शाळांना 20 टक्के अनुदान होतं त्यांना 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहीती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिली.

 विनाआनुदानित शाळांना 304 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे, यासंदर्भात कायदेशीर प्रक्रीया सुरू आहे. सातव्या वेतन आयोगानुसार शिफारशीने सरकार न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, या अनुदानाचा लाभ मोठ्या प्रमाणात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होईल. या निर्णयाचा फायदा 4623 शाळा, 8757 तुकड्या,13000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-