मुंबई | सेंचुरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये पहिला कसोटी सामना खेळले गेला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार विराट कोहलीचा हा निर्णय भारतीय सलामीवीरांनी योग्य ठरवला. पहिल्या डावात क्लासी के एल राहुलने धमाकेदार पारी खेळत शतक ठोकलं.
के एल राहुलला मयंक अग्रवालने देखील मोलाची साथ दिली. मयंकने पहिल्या डावात 60 धावा केल्या. मात्र, चेतेश्वर पुजाराल जास्त वेळ मैदानात टिकता आलं नाही. तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर रहाणेने चांगली फलंदाजी करत 48 धावा केल्या.
भारताचा पहिला डाव 327 धावांवर समाप्त झाला. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांना जास्त वेळ मैदानात टिकता आलं नाही. दक्षिण अफ्रिकेचे फलंदाज झटपट बाद झाले.
मिडल ऑर्डर फलंदाज बावूमाने काही संयमी खेळी केली. त्याने 52 धावा करत अफ्रिेकेला 197 धावांपर्यंत पोहचवलं.
पहिल्या डावात आघाडी मिळाल्यानंतर आता भारतीय फंलदाजांनी देखील आक्रमक सुरूवात केली. मात्र कोणत्याही खेळाडूला मोठी पारी खेळता आली नाही. कर्णधार कोहली देखील झटपट बाद झाला. दुसऱ्या डावात भारताने 174 धावा केल्या.
सेंच्युरियनच्या मैदानावर भारताने दिलेल्या 305 धावांचं लक्ष्य पुर्ण करण्याचं आव्हान अफ्रिकेपुढं होतं. दुसऱ्या डावात अफ्रिकेच्या एग्लरने एकाकी झुंज दिली. त्याने 77 धावा केल्या. मात्र, दक्षिण अफ्रिकेला फक्त 191 धावा करता आल्या.
दरम्यान, भारतीय संघाने इतिहास रचला आहे. सेंच्यूरियनमध्ये कसोटी सामना जिंकणारा भारत केवळ तिसराच संघ बसला आहे. यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने हा पराक्रम केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
पार्थ पवार म्हणतात,”आत्या तुम्ही काळजी घ्या, तुम्ही दोघं लवकरच…”
पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा गौप्यस्फोट, आता अजित पवार म्हणाले…
“नारायण राणेंना नोटीस देऊन बोलावणे हा तर कायदेशीर अपराध”
भारतीय जवानांना मोठं यश; जम्मू-कश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा
“आम्ही मोदींचं अनुकरण करतो, ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही लावत नाही”