‘शीना बोरा जिवंत’; इंद्राणी मुखर्जीच्या दाव्याने देशात खळबळ

मुंबई | देशभरात गाजलेल्या शीना बोरा (sheena bora) हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जीनं (Indrani Mukerjea) केला आहे.

आरोपी इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात इंद्राणीनं केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणात खळबळ माजली आहे.

शीना बोरा जिवंत असल्याचा दावा इंद्राणीनं या पत्रात केला आहे. इतकंच नाही तर शीनाला काश्मीरमध्ये एका महिलेनं पाहिल्याचंही तिनं म्हटलं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आपल्या पत्रात मुखर्जीनं लिहिलं आहे की, नुकतीच ती तुरुंगात एका महिलेला भेटली होती, जिने काश्मीरमध्ये शीना बोराला भेटल्याचं सांगितलं. त्यामुळेच सीबीआयला शीना बोराचा काश्मीरमध्ये शोध घेण्यास सांगितलं आहे. इंद्राणी मुखर्जी सध्या भायखळा कारागृहात कैद आहे.

नोव्हेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने शीना बोरा हत्या प्रकरणात मुखर्जी यांना जामीन नाकारला होता. हा खटला त्यांचा ड्रायव्हर श्यामवर राय यांनी सरकारी साक्षीदार झाल्यानंतर दिलेल्या जबाबावर आधारित असल्याचा युक्तिवाद मुखर्जी यांनी केला आहे.

प्रदीर्घ काळ तुरुंगात राहिल्यानंतर मुखर्जी यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्या पथकाने प्रकृतीच्या समस्येचे कारण देत जामीन मागितला. मुंबई उच्च न्यायालयाने अनेक वेळा त्यांचा जामीन फेटाळला आहे.

यापूर्वी, 2020 मध्ये, इंद्राणीचा माजी पती आणि सहआरोपी पीटर मुखर्जीची शीना बोरा हत्या प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासानंतर जामिनावर सुटका झाली होती.

मुखर्जी यांना त्यांची सावत्र मुलगी शीना बोरा हिच्या हत्येचा कट रचल्याबद्दल अटक करण्यात आली होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या गुन्ह्यात त्यांचा प्रथमदर्शनी सहभाग दर्शविणारा कोणताही पुरावा नसल्याचा निर्णय दिला. त्यांची माजी पत्नी इंद्राणी मुखर्जी 2015 मध्ये त्यांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी अटक झाल्यापासून भायखळा तुरुंगात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे ठाकरे सरकार चालतंय तोपर्यंत…”

मोठी बातमी! ठाकरे सरकारला एकाच दिवशी सलग दुसरा झटका 

रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरेंचं ट्विट, म्हणाले… 

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका 

“वसंत मोरे, संदीप देशपांडे यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं, पण…”