मुंबई | शहरातील मनसेच्या (Maharashtra Navnirman Sena) फायरब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी आता मनसेला अखेर जय महाराष्ट्र केला आहे. पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत त्याबाबत घोषणा केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. रूपाली पाटलांनी मनसेला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
रूपाली पाटलांनी आज मुंबई उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. मुंबई अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, पक्षातील अंतर्गत वादामुळे रूपाली पाटलांनी मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यानंतर त्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते.
दरम्यान, रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिला असल्याचं बोललं जात होतं. अशात रूपाली पाटील ठोंबरेंनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलंय. पक्षातील काही रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संदीप देशपांडे आणि वंसत मोरे आम्ही भावंड म्हणून काम केलं आहे. संदीप देशपांडे, वसंत मोरे काही बोलले असतील, त्यांना आता उत्तर देणार नाही, मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे आणि संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“शकुनी काकाच्या इशाऱ्यावर हे ठाकरे सरकार चालतंय तोपर्यंत…”
मोठी बातमी! ठाकरे सरकारला एकाच दिवशी सलग दुसरा झटका
रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरेंचं ट्विट, म्हणाले…
मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका
“वसंत मोरे, संदीप देशपांडे यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं, पण…”