पुणे | प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं किर्तन ऐकायला लहान मुलं ते वयोवृद्ध व्यक्ती अगदी आवर्जुन हजेरी लावतात. इंदुरीकर महाराज त्यांच्या खास शैलीत किर्तन सांगताना सर्वांचं मनोरंजन करतात.
हेच इंदुरीकर महाराज अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. किर्तनावेळची एखादी क्लिप व्हायरल झाल्याने इंदुरीकर महाराज अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचंही पाहायला मिळालं.
इंदुरीकर महाराजांच्या विनोदी शैलीतील किर्तनं सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असतात. मात्र, आता इंदुरीकर महाराजांनी सोशल मीडिया व युट्यूबचा चांगलाच धसका घेतला आहे.
शिरूर येथे किर्तन सांगताना एकजण शुटींग करत होता. मात्र, यावेळी किर्तनाचं शुटींग करायचं नाही, असा सज्जड दमच इंदुरीकर महाराजांनी भरला. यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप इंदुरीकर महाराजांनी केला. तर टीआरपीसाठी मला बदनाम केलं जातं, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.
माझ्या किर्तनात कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नसतो. मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलत असतो, असंही इंदुरीकर महाराज यावेळी म्हणाले.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांच्या किर्तनातील काही भाग सोशल मीडियावर व्हायरल होतो. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे की काय पण इंदुरीकर महाराजांनी किर्तनावेळी व्हिडीओ करू दिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपला धक्का देत ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
“अग्निपथ योजना म्हणजे सरकारचं दिशाहीन पाऊल”
‘हे बदल म्हणजे आभाळाला ठिगळ लावल्यासारखं’, रोहित पवारांची मोदी सरकारवर टीका
“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच विकासाला सुरूवात झाली”
अग्निपथ योजनेवरून संजय राऊत मोदी सरकारवर बरसले, म्हणाले…