मुंबई | सध्याच्या धावपळीच्या जगण्यात अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवायला लागल्या आहेत. बाहेर राहणे, ऑफिसची वेळ, प्रवास, काम अशा अनेक कारणांनी वेळेवर जेवता येत नाही. परिणामी अनेकजण काॅफी पिण्याची (Coffee Benefits) सवय लावतात.
काॅफीच्या सेवनाचा अनेक फायदे होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. दिवसातून किमान दोन वेळा काॅफी पिल्यास ह्रदयाला फायदा होतो. काॅफी ही पचन होण्यास हलकी असल्यानं शरीराला समस्या करत नाही.
जामा इंटरनलच्या वार्षिक अभ्यासात याबाबत माहिती देण्यात आली आहे. काॅफी पिणाऱ्यांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नैसर्गिक पद्धतीप्रमाणं काॅफी मानवी शरीराला फायदेशीर आहे.
1 कप काॅफीत जवळपास 100 मिली ग्राम कैफीन असतं. काॅफी पिल्यास शारिरीक थकवा दूर होतो आणि कामासाठी ऊर्जा मिळते.
दररोज 2 कप काॅफी पिणाऱ्यांना अनेक प्रकारे आरोग्यासाठी मदत होते. सातत्यानं खेळ खेळणाऱ्यांसाठी काॅफी ही उत्साहवर्धक असते.
ह्रद्याशी संबंधित अनेक आजारांवर मात करण्यास काॅफी कारणीभूत असते. परिणामी सध्या काॅफी पिणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.
3 कप काॅफी पिणाऱ्यांमध्ये स्ट्रोकची समस्या 21 टक्के कमी असते. अचानकपणे शारिरीक समस्या जाणवण्याचं प्रमाण देखील कमी होतं. दैनंदिनपणे जास्तीत जास्त काॅफी पिण्याचं प्रमाण वाढवलं गेलं तर फायदा होतो.
दरम्यान, काॅफी पिण्याचा फायदा असला तरी अधिक प्रमाणात काॅफी पिणंदेखील चांगलं नाही. शारिरीक गरजेनूसार काॅफी पिल्याचा फायदा होतो.
महत्त्वाच्या बातम्या –
Nawab Malik: मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता, कारण…
“आमच्याकडं मसाला तयारे, आम्ही थेट दणका देणार”
आमदारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय!