सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना भर चौकात फटकावले पाहिजे- उद्धव ठाकरे

मुंबई : काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलेचा हार घातल्याचा प्रकार समोर आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर आक्रमक भूमिका घेतली आहे. जे कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही अशांना भर चौकात फटकावलं पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. 

शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी शेतकरी पीक विम्याबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उपस्थित पत्रकारांनी दिल्लीतील घटनेबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला त्यावर उद्धव यांनीही नाराजी व्यक्त करत अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दिल्ली विद्यापीठात वीर सावरकर, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. मात्र सावरकरांच्या पुतळ्याला एनएसयूआयने आक्षेप घेतल्याने विद्यापीठात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

एनएसयूआय आणि डाव्या विद्यार्थी संघटनानी विरोध करत हा पुतळा विनापरवानगी बसवण्यात आल्याने तो हटवण्याची मागणी केली होती.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वीर सावरकरांचे योगदान मोठे होते. त्यांच्याबाबत असे कृत्य करणे वाईट आहे. सावरकरांचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. कुठेही कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची सर्व समाजाने काळजी घेतली पाहिजे, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. 

दरम्यान, दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला चपलेचा हार घातल्याच्या या कृत्यावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“पीक विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये… लवकरात लवकर घ्या आणि शेतकऱ्यांना द्या”

-मुख्यमंत्री एमबीए आहेत, याचा अर्थ असा की…; अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

-संंजय बांगर यांना हटवून भारतीय फलंदाजीच्या प्रशिक्षकपदी ‘यांची’ निवड

-समाजकंटकांना पोलीस ठोकणार की मी ठोकू???- नितीन नांदगावकर

-…यापुढे राष्ट्रवादीच्या सभेत ‘हे’ दोन झेंडे राहतील- अजित पवार