IPL 2022: “RCB जिंकली तरी मला आनंद होणार नाही”; किंग कोहलीच्या वक्तव्यानं खळबळ

मुंबई | आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) नुकतीच सुरूवात झाली आहे. या सिझनमधील 5 सामने खेळून झाले आहेत. लिलावानंतर आता सर्व संघ ताकदवान दिसत आहेत. अशातच आयपीएलमधील लाडकी टीम RCB देखील नव्या जोशासह मैदानात उतरली आहे.

आरसीबी संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचा चषक जिंकता आला नाही. अशातच आता विराट कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे संघाला मोठा धक्का बसला.

बंगळुरूचं नेतृत्व आता फाफ डुप्लेसिसकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे विराटवर सध्या कोणताही ताण नाही. अशातच आता विराट कोहलीच्या वक्तव्याने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.

माझ्यासोबत यंदा एबी डिव्हिलियर्स खेळत नाहीये, आम्ही जवळपास 10 वर्षे एकत्र खेळलो होतो.यंदाच्या सिझनमध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली तर त्यांना फार आनंद होणार नाही, असं विराट कोहली म्हणाला आहे.

ज्यावेळी बंगळुरू आयपीएल जिंकेल त्यावेळी मी एबी डिव्हिलियर्सचाच विचार करेन. कारण आम्ही दोघांनी एकत्र आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विचार केला होता, असं कारण देखील विराटने यावेळी दिलं आहे.

डिव्हिलियर्सने ज्यावेळी निवृत्तीचा सांगितला. त्यावेळी मलाच धक्काच बसला. घरी परतत असताना मला एबी डिव्हिलियर्सची व्हॉइस नोट मिळाली, असंही त्याने यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, फाफ डुप्लेसिस आणि एबीडी एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत. दोघांनी दक्षिण अफ्रिकेसाठी मोठी जबाबदारी देखील पार पाडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसचे 25 पेक्षा जास्त आमदार नाराज, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात

  “संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”

  “भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”