विराटच्या RCBला मिळणार नवा कर्णधार; आता धोनीचा ‘हा’ भिडू सांभाळणार जबाबदारी

मुंबई | इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामासाठी (IPL 15)  सर्व फँचायझीनी संघ बांधणी केली आहे. कागदावर तरी सर्वच्या सर्व 10 संघ तगडे दिसत असले तरी मैदानावर त्यांची प्रत्क्ष कामगिरी कशी होते, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीने काही नवीन चेहऱ्यांसह अनुभवी खेळाडूंनाही आपल्या ताफ्यात घेतलं आहे. विराट कोहलीनं आरसीबीचं कर्णधारपद सोडल्यानंतर त्यासाठी ग्लेन मॅक्सवेल हे नाव आघाडीवर होतं.

मॅक्सवेल आता भारताचा जावाई होणार आहे म्हणजेच लग्नामुळे तो आयपीएलच्या सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे. अशातच आरसीबीचा नवा कर्णधार कोण असा सवाल उपस्थित केला जात होता.

आरसीबीचा संघ दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिसकडे कमान देऊ शकतो, असं संघाच्या जवळच्या सूत्राने सांगितलंय.

फाफ डू प्लेसिस हा योग्य पर्याय दिसतो. फाफकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पुरेसा अनुभव आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे तो आयपीएलच्या पूर्ण पर्वासाठी उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, डू प्लेसिस हा दीर्घकाळ चेन्नई संघाचा भाग होता. गेल्या मोसमात त्यानं धोनीच्या संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

नुकत्याच झालेल्या लिलावात आरसीबीनं फाफ डू प्लेसिसला 7 कोटी रूपयांना संघात घेतलं आहे. त्यामुळे आता विराट आणि फाफची जोडी आयसीबीसाठी किती परिणामकारक ठरते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईच्या बोरिवली परिसरातील 24 मजली इमारतीला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती

Video: ‘ऊ अंटावा’नंतर समांथाचा आणखी एक डान्स व्हायरल; विमानतळावर नक्की काय झालं?

“बाबा परत असं घोड्यावर बसायचं नाही”; अमोल कोल्हेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

  “…हिशोब इथेच चुकते करणार”; निलेश राणे आक्रमक

  “सशक्त सरकारने सशक्त कारवाई करणे अपेक्षित आहे”; वरूण गांधींचा सरकारला घरचा आहेर