मुंबईच्या बोरिवली परिसरातील 24 मजली इमारतीला भीषण आग, अनेकजण अडकल्याची भीती

मुंबई । मुंबईच्या बोरिवली परीसरातील चिकूवाडीमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या चिकूवाडीमध्ये दाखल झाल्या. ही आग इतकी भीषण आहे की आसपासच्या परीसरात धुराचे लोट परले आहेत.

त्यामुळे आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाकडून युध्द पातळीवर काम सुरू करण्यात आलंय. या आगाीत अनेक लोकं अडकल्याची भीती देखील आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी सुध्दा पोहचले आहेत. परंतु आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बोरिवली पोलिसांकडुन मिळालेल्या माहिती नुसार पॅरेडाइज् नावाच्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर ही आग लागली आहे.

बोरिवलीच्या उत्तर चिकूवाडी परिसरातील ही इमारत असून इमारती मधील बऱ्याच लोकांना बाहेर काडण्यात आलं आहे.

या इमारती मध्ये एकूण 24 मजले आहेत परंतु काही लोक अजूनही इमारती मध्येचं अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, मुंबईतल्या गडबजलेल्या वस्तीत मागील काही वर्षांपासून आग लागल्याचं प्रमाण पहायला मिळतंय. त्यामुळे आता महापालिका देखील सतर्क झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: ‘ऊ अंटावा’नंतर समांथाचा आणखी एक डान्स व्हायरल; विमानतळावर नक्की काय झालं?

“बाबा परत असं घोड्यावर बसायचं नाही”; अमोल कोल्हेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

  “…हिशोब इथेच चुकते करणार”; निलेश राणे आक्रमक

  “सशक्त सरकारने सशक्त कारवाई करणे अपेक्षित आहे”; वरूण गांधींचा सरकारला घरचा आहेर

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल