छगन भुजबळांच्या हाती पुन्हा भगवा? उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या जोरदार चर्चा चालू आहेत. यावरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असं आश्वासन उध्दव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलं आहे. यावरून भुजबळांना पुन्हा शिवसेनेत एन्ट्री नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजप शिवसेनेमध्ये पक्षांतर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ देखील शिवसेनेत घरवापसी करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

नाशिकचे शिवसेना नेते बबनराव घोलप आणि शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांऩी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन भुजबळांच्या घरवापसीला विरोध केला आहे. 

छगन भुजबळांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला त्रास आम्ही विसरलो नाही, अशा भावना शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्या समोर मांडल्या. 

महत्वाच्या बातम्या-