पंकजा मुंडेंना चिमटे काढणारा व्हायरल झालेला व्हीडिओ खरा आहे का???; “परळी, तुला पोटाची चिंता नाही काय?”

बीड : ‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?’ हे गाणं दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. याच धर्तीवर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नावे महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंना चिमटे काढणारा एक व्हीडिओ समोर आला आहे. ‘परळी, तुला पोटाची चिंता नाही काय?’ असा प्रश्न या गाण्यातून विचारण्यात आला आहे.

परळी मतदारसंघातील समस्यांचा पाढा या गाण्यातून वाचण्यात आला आहे. या समस्या सोडवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. उलट नुसतं भावनिक आवाहन करुन मतं मिळवली, असा दावा या गाण्यातून करण्यात आला आहे.

‘लय भारी’ या यूट्यूब अकाऊण्टवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हीडिओमध्ये धनंजय मुंडे यांचा फोटो दिसत असला, तरी यामधील मतं त्यांची आहेत का, याविषयी माहिती नाही. शिवाय पंकजा मुंडे यांचा थेट उल्लेख गाण्यात नसला, तरी अप्रत्यक्षपणे त्यांना टोला लगावण्यात आला आहे.

अंबाजोगाई येथील रखडेला रस्ता, कारखान्यांचे वाजलेल्या तीन तेरा, कामगारांना वेळेवर मिळत नसलेले पगार, उड्डाण पुलांचा अभाव अशा अनेक समस्यांचा उल्लेख गाण्यामध्ये आहे.

दरम्यान,पंकजा आणि धनंजय या दोघांमध्ये नेहमीच वाक्-युद्ध रंगताना दिसतं. आता निवडणुकीच्या प्रचारात ते शिगेला पोहचताना दिसेल.

 

महत्वाच्या बातम्या-