‘या’ माजी क्रिकेटपटूचा भाऊ करतोय सानिया मिर्झाच्या बहीणीसोबत लग्न

मुंबई : माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन आणि टेनिसस्टार सानिया मिर्झा एकमेकांचे व्याही होणार आहेत. अझरुद्दीनचा मुलगा असद आणि सानियाची बहीण अनम मिर्झा लवकरच निकाह करणार आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात हा विवाह सोहळा होणार आहे.

असद आणि अनम एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चा आधीपासूनच रंगत होत्या. त्यानंतर नुकतंच सानियाने या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आहे. डिसेंबरमध्ये अनम आणि असद लगीनगाठ बांधणार आहेत. आम्ही नुकतंच पॅरिसला तिची बॅचलरेट ट्रीप करुन आलो. आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत असं सानियाने म्हटलं आहे.

सानिया मिर्झाने असदबरोबर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘फॅमिली’ असं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर असद आणि अनम यांच्यात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चांना  सोशल मीडियावर ऊत आल आहे.

असद हा उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. सप्टेंबर 2018 मध्ये त्याची निवड गोवा क्रिकेट संघात झाली होती. गेल्या वर्षी त्याने रणजीत पदार्पण केलं. 

अनम मिर्झा ही व्यवसायाने फॅशन स्टायलिस्ट आहे. सानिया बऱ्याचशा इव्हेंट्समध्ये बहिणीने स्टाईलाइज्ड केलेले कपडे परिधान करताना दिसते. अनमचं हे दुसरं लग्न आहे. 2015 मध्ये तिने अकबर रशीदशी लग्न केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-