राज्यातील ‘या’ भागात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता!

मुंबई | पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमान किंचित घट नोंदली आहे. पुढील पाचही दिवस महाराष्ट्रात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पाचही दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार (Rain in Sindhudurga) आहेत. याठिकाणी हवामान खात्याने (IMD) कोणताही इशारा दिला नाही.

भारतीय हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या माहितीनुसार, पुढील पाचही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ हवामान (Cloudy weather) राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून सिंधुदुर्गातही पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे.

राज्यात मात्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. खरंतर, सध्या दक्षिण तामिळनाडूच्या किनारीपट्टी भागात ईशान्यकडील वारे सक्रीय झाले आहेत.

पुढील तीन दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हळुहळू पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

येत्या चोवीस तासात अंदमान आणि निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल, तेव्हा…” 

“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!