पोस्ट ऑफिस विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती; मिळणार भलामोठ्ठा पगार

नवी दिल्ली | भारतीय डाक विभाग सातत्यानं नव नवीन योजना घेऊन येत आहे. या योजनांच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस ग्राहकांना आकर्षक सुविधा दिल्या जातात.

पोस्ट ऑफिस विभागात नोकरीला लागणाऱ्यांचं देखील प्रमाण चांगलं आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेला हा विभाग चांगला पगार असणाऱ्या नोकऱ्या देतो.

पोस्टात नोकरी करणं म्हणजे सुखी जिवन जगणं अशी व्याख्या झाली आहे. परिणामी पोस्टाच्या नोकरीसाठी आवेदनपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

पोस्ट ऑफिस आकर्षक पगारासह सरकारी सुविधा उपलब्ध करून देतं. पोस्टात नोकरीला असणाऱ्यांना केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजनांचा थेट फायदा होता.

पोस्ट ऑफिस विभागात सध्या नवीन जागा भरण्यात येणार आहेत. फक्त 10 वी पास अशी शैक्षणिक अहर्ता असणाऱ्यांना देखील आवेदनपत्र दाखल करता येणार आहे.

स्टाफ कार चालक पदाच्या 29 जागांसाठी आवेदनपत्र स्विकारण्यात येणार आहेत. आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ही 15 असणार आहे. परिणामी आता अनेकजण आवेदनपत्र दाखल करत आहेत.

आवेदनपत्र सादर करताना आवेदकाला हलके आणि जड अशा पद्धतीची वाहने चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. तसेच त्याच्याकडं चालगाडी वण्याचा वैध परवाना असणं गरजेचं आहे.

उमेदवाराचे वय 18-27 यामध्ये असायला हवे. या पदासाठी निवडलेल्या गेलेल्या उमेदवारांना 19,900- 63,200 ग्रेड-2 वेतनश्रेणी लागू असणार आहे. परिणामी आवेदनपत्र सादर करण्याचं आवाहन पोस्ट विभागाकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भाजप नेत्याने लावले अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स, म्हणाले ‘दादा आपले आभार’ 

“…तेव्हा तो पठ्ठ्या कुठे होता?, त्यांनी ही नौटंकी आता थांबवावी” 

“…नाहीतर आम्ही काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला नसता”

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”