“लोक बेकार असतात, माझ्या सारखे सेक्सी कपडे घालतात त्यांना…”

मुंबई | बॉलिवूडमधली धाडसी अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

तरुण अभिनेत्रींना लाजवेल अशा स्टायलिश कपड्यांमध्ये नीना अनेकदा दिसतात. या वयात स्लायलिश कपडे घातल्यानं त्यांच्यावर नेटकऱ्यांनी बरेचदा टीका केली आहे.

या टीकेला आणि ट्रोलर्सना नीना यांनी एका व्हिडीओ पोस्ट करत सडेतोड उत्तर दिलं आहे.

सेलिब्रिटींना अनेकदा शॉर्ट किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्यानं ट्रोल करण्यात येतं. त्यामुळं एखाद्याची त्याच्या कपड्यावरुन पारख करू नका, हे चुकीचं आहे, असं नीना गुप्ता यांनी म्हटलं आहे.

मी संस्कृतमध्ये एम फील केलं आहे. अजूनही बाकी बरंच शिकले. म्हणून कपड्यांवरून एखाद्याबद्दल तुमचं मत तयार करू नका, असंही नीना गुप्ता यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत नीना गुप्ता यांनी विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला दिला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्याठिकाणी स्वतःचा अनुभव सांगितला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

संजय राठोडांना पुन्हा मंत्री व्हायचंय, म्हणाले ‘उद्धव ठाकरे मला मानसन्मानाने ….’

“शरद पवारसाहेब नसते तर मी कधीही खासदार झाले नसते” 

“राजकारण करण्याच्या नादात आपले संस्कार विसरून गेलेत” 

“मातोश्रीत बसलेल्यांनी सभेला लाखोंची गर्दी जमवून दाखवावी” 

सिनेसृष्टीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचं निधन