मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील विकास कामांच्या मुद्द्यांवरुन अमृता फडणवीस यांनी महापालिकेला सुनावलं आहे.
कोणी काही वक्तव्य करतात. त्यावर मग आंदोलनं केली जातात. मात्र आपण स्वतः विचार करायला हवा की आपण काय बोलायला हवं काय बोलायला नको. वक्तव्य केल्यानंतर अॅक्शन घेतली जातात मात्र मानसिकतेत बदल होणं गरजेचं आहे. कोणावरही वैयक्तिक टिपणी व्हायला नको, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई महाराष्ट्रात अनेक मुद्दे आहे. रस्ते, एसटी कर्मचारी यांच्या मुद्द्यावर लक्ष न देता खिशे भरण्याकडे लक्ष दिलं जातं त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून मी याबाबत नेहमीच मत व्यक्त करत असते.
खूप घाणेरड्या पद्धतीने महावसूली सरकारची कामं सुरू आहे. हे फक्त मीच नाही तर संपूर्ण जग म्हणतंय. या सरकारमध्ये एकाच्या बाबतीत वेगळे तर दुसऱ्याच्या बाबतीत वेगळा न्याय घेतला जातो.
भाजप आणि आरएसएस हे स्त्री पुरोगामी आहेत. स्त्रीचा सर्वात जास्त आदर हा आरएसएसकडून केला जातो, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबई महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. रस्ते खड्डे या समस्यांमुळे सामान्य नागरिक म्हणून मलाही त्रास होता नामर्द शब्द ज्यांच्या बाबत वापरला होता त्यांना लोकांनी ते नाव दिलं आहे.
मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो, असंही अमृता फडणवीस यांनी सांगतिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Gold Rate: आजचे सोन्याचे दर काय? जाणून घ्या एका क्लिकवर
गोळीबाळानंतर ओवेसींच्या सुरक्षेत वाढ, आता देणार Z सेक्युरिटी
मोठी बातमी! बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, वादग्रस्त वक्तव्य भोवलं
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी अडचणीत; ईडीनं केली ‘ही’ मोठी कारवाई
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?; वाचा आजचे ताजे दर