“अहो, तुम्ही सत्तेसाठी किती हापापलेले आहात हे मध्य प्रदेशच्या ऑपरेशन लोटसवरून दिसून आलं”

मुंबई | भाजपने काँग्रेसच्या चार तर मित्रपक्षांच्या चार आमदारांना डांबून ठेवलं. त्यांना 25 ते 30 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप मध्य प्रदेशमधील सत्ताधारी काँग्रेसने केला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

अवैध पद्धतीने मिळवलेल्या संपत्तीचा गैरवापर करून आमदारांना खरेदी करण्याची भाजपची दुसरी वेळ आहे. त्यामुळे भाजप सत्तेसाठी किती हपापलेलं आहे हे मध्य प्रदेशच्या ऑपरेशन लोटसवरून दिसून आलं असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

मध्यप्रदेशची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेसला काठावर बहूमत मिळालं आहे. दोन चार आमदारांच्या गैरहजेरीमुळे सत्ता स्थापन होणे कठीण आहे. त्यामुळे याचाच फायदा भाजप घेत असल्यांचही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने महाराष्ट्रात केलेल्या ऑपरेशन लोटसमुळे महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना दाखवून दिलं आणि तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-निर्भया प्रकरण: आरोपी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

-मोबाईल वापरणाऱ्यांनो जरा सावधान, कारण…

-‘किस घेणं बंद करा’; आरोग्यमंत्र्यांचे देशातील नागरिकांना आदेश

-अहो, हे सरकार उलट्या दिशेने का जात आहे?; विनायक मेटेंचा सरकारला सवाल

-लक्षात ठेवा, प. बंगालमध्ये राहणारा प्रत्येक बांगलादेशी भारतीय नागरिक आहे- ममता बॅनर्जी