मुंबई : आमच्या आमदारांचे मोबाईल बंद असतील. पण तुम्ही आमच्या आमदारांना का संपर्क करताय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांना केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीने आमदारांना डांबून ठेवलं असून आमदारांचे मोबाईल काढून घेतले आहेत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यालाच जयंत पाटील यांनी उत्तर दिलं.
विश्वासदर्शक ठराव महाआघाडी जिंकणारच आहे, 170 पेक्षा जास्त सदस्यांचे पाठबळ आहे. आमदारांचे मोबाईल काढून घेतले म्हणतात, पण भाजपला कशाला आमच्या आमदारांशी संपर्क करायचा आहे? भाजप घोडाबाजार करत आहे आणि त्यांचं पितळ आता उघड पडलेलं आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, लोकशाही उद्ध्वस्त करत आहेत, आज त्यांचा डाव फसला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
…तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल; नवाब मलिकांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर – https://t.co/pUEXVmpzhD @nawabmalikncp @ChDadaPatil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी मोदीं कोणत्या ‘दोन’ अटी ठेवल्या होत्या? – https://t.co/ZOlh99BKTw @PawarSpeaks @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
ठाकरे सरकारचा शपथविधी बेकायदा- चंद्रकांत पाटील –https://t.co/OARSUYHHSB @ChDadaPatil @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019