“जा ना वाघासारखं विश्वासदर्शक ठरावाला सामोरं… लपताय कशाला??”

मुंबई : आत्मविश्वासाची व्याख्या आमदारांना लपवून ठेवणं आहे काय?? ही आत्मविश्वासाची व्याख्या? गेली महिनाभर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना डांबून ठेवलंय. विश्वास आहे ना मग त्यांना डांबून का ठेवलंय? बहुमत आहे ना जा ना वाघासारखं विश्वासदर्शक ठरावाला सामोरं… लपताय कशाला? अशी जोरदार टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

शिवसेना सतत मर्द असल्याची भाषा करत असते.  मग विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी ही मर्दानगी दाखवण्याची चांगली संधी होती, असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे, तसंच तुम्हाला मर्द म्हणून बोलायचा अधिकार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

बहुमत नसल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हंगामी अध्यक्ष बदलला असल्याची टीकाही नितेश यांनी केली आहे. तर आगामी काळात सरकारचा घाम काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, आरेसंबंधी नितेश यांना विचारला असता पक्षाध्यक्षाच्या भूमिकेतून बाहेर या आणि मुख्यमंत्री म्हणून निर्णय घ्या, असा सल्ला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-