कोल्हापूर | राज्यात नेहमी राजकीय वातावरण जोरदार पेटलेलं पहायला मिळतं. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेहमीच एकमेकांना लक्ष करताना दिसत असतात.
गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं जात आहे.
शरद पवारांवर सतत होणाऱ्या टीकांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रात वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना गोळी देऊन झोपविले जात आहे, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शरद पवार यांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, अस इशाराही आव्हाडांनी यावेळी दिला.
कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना आव्हांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केल्याचं पहायला मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी ! ‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्यांसह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
‘या’ ठिकाणी आढळला कोरोना नवा व्हेरियंट, 7 जण बाधित
अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त