“आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही”

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

कोल्हापूरमध्ये जितेंद्र आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते अनेक मुद्द्यांवर बोलेले. याशिवाय त्यांनी भाजपवरही निशाणा साधल्याचं पहायला मिळालं.

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं जात आहे.

शरद पवारांवर सतत होणाऱ्या टीकांवर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, अस इशाराही आव्हाडांनी यावेळी दिला.

महाराष्ट्रात वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना गोळी देऊन झोपविले जात आहे, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे….”

  मोठी बातमी ! ‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्यांसह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

  ‘या’ ठिकाणी आढळला कोरोना नवा व्हेरियंट, 7 जण बाधित

  अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

  मोठी बातमी! राज्यात ‘इतक्या’ हजार पदांसाठी पोलीस भरती