मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यात केलेल्या भाषणावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची नक्कल केली.
नागानं फणा काढावा असा त्यांचा चेहरा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. त्यावरून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
स्टॅंड अप कॉमेडियनच्या जागा खाली आहेत, त्या जागा राज ठाकरे यांनी घ्याव्यात, अशी टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. हो माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. परंतु, जो मस्ती करेल त्याच्यासमोर फणा काढला जाईल, असंही आव्हाड म्हणाले.
शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांच्याच विचारांवर चालत होते, हे राज ठाकरे यांना माहीत नसावं. कारण त्यांनी बहुजन समाजाचा इतिहास वाचला नाही, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यातील उत्तरसभेत केलेल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या-
“दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसलं”
Raj Thackeray | “वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची”
“शरद पवार संजय राऊतांना कुठे लटकवतील ना, कळणार सुद्धा नाही”