मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यातील उत्तरसभेत केलेल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारसह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. खासदार, संजय राऊत, शिवसेना, राष्ट्रवादी, राज ठाकरे, ट्विट, महाराष्ट्र केसरी न्य
राज ठाकरेंनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. आता या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. दिवा विझताना मोठा होतो, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
दिवा विझताना मोठा होतो, हे आज पुन्हा दिसलं. जय महाराष्ट्र, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
दरम्यान, संजय राऊत हे राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे हेच कळत नाही. यांची संपत्ती जप्त केली तर हे पत्रकार परिषदेतून शिव्या देत आहेत. परंतु, हे पत्रकार परिषदेत बोलताना कोणती भाषा वापरतात हे यांना तरी समजतं का? असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिलं आहे.
2014 ला मोदींना पाठींबा, 2019 ला मोदींना विरोध. आता पुन्हा मोदींची पालखी खांद्यावर. वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची, पुतण्या बाळासाहेब ठाकरेंचा, मात्र नातं बाळासाहेबांचा विचार संपवणाऱ्या लोकांशी. वारंवार रंगरूप बदलणारे व्हायरस महाराष्ट्रात वाढत आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Raj Thackeray | “वारसा प्रबोधनकारांचा, मात्र विचारसरणी नथुराम गोडसेची”
“शरद पवार संजय राऊतांना कुठे लटकवतील ना, कळणार सुद्धा नाही”
पुणेकरांना झटका, सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ
मोठी बातमी! मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका
राज ठाकरेंच्या सभेसाठी आलेला ‘हनुमान’ पोलिसांच्या ताब्यात; झालं असं की…