गद्दारीने परतफेड करण्याचा इतिहास आलाय- जितेंद्र आव्हाड

मुंबई |  विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. मात्र आघाडीतले काही नाराज नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची संख्या अधिक आहे. याच नेत्यांवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

पक्ष सोडताना सचिन अहिर, चित्रा वाघ आणि वैभव पिचड यांनी शरद पवार यांचे अनंत उपकार आहेत. त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही अश्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या याच प्रतिक्रियांचा आव्हाडांनी खरपूस समाचार घेतला आहे.

काय उत्तम रित्या परातफेड केलीत…. ‘गद्दारीने परतफेड’ हे इतिहासात नवीनच आहे, अशी उपरोधिक आणि तितकीच संतापजनक प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.

अहिर यांनी पवार कायम माझ्या हृदयात असतील. चित्रा वाघ यांनी पक्षात एवढ्या महत्वाच्या पदावर काम करायला दिलं याबद्दल पवारांचे आभार मानले तर पिचड यांनी पवारांचं ऋण कधीही फिटणार नाही, असं म्हटलं होतं.

दरम्यान, शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पक्षांतरावर मौन सोडलं. जे गेलेत त्यांना जाऊ द्या. आपण तरूणांना संधी देऊ, असं म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचा हा मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार!

-राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार म्हणतो मी पवारांसोबतच राहणार; ‘कोणाच्याही संपर्कात नाही’

-यापूर्वी मी 6 आमदारांचे 60 आमदार करून दाखवले होते… विसरू नका- शरद पवार

-आघाडीची सत्ता येणार नाही… म्हणून भाजपमध्ये जातोय- वैभव पिचड

-प्रकाश आंबेडकरच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार!