‘…म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये’; जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले

मुंबई | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. यामुळे राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये, असं म्हणत जितेंंद्र आव्हाड यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत संख्याबळ पाहून निर्णय घेण्यात यायला हवा. शरद पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व स्वत:ला राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात कोंडून घेऊ शकत नाहीत, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

जे राजकारणी मुख्यप्रवाहात असतात, त्यांनी मुख्यप्रवाहातच राहावं. ज्या पद्धतीने शरद पवार आजही ग्रामीण भागात फिरतात, लोकांशी संवाद साधतात ते पाहता त्यांनी याचपद्धतीचे काम कायम करावे असं मला वाटतं, असं त्यांनी म्हटलंय.

शरद पवार जोपर्यंत लोकांच्यात मिसळत नाहीत तोवर त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि आनंद दिसत नाही. त्यामुळे त्यांनी लोकांमध्येच राहावे, तोच त्यांचा खरा हक्क आहे, असं आव्हाड म्हणालेत.

दरम्यान, राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. यादरम्यान मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“असं करुन तुम्ही शरद पवार यांची प्रतिष्ठा कमी करताय”; कोर्टानं पोलिसांना फटकारलं 

कोल्हापुरात वातावरण तापलं; शिवसेनेचे पराभूत पवार संभाजीराजेंवर संतापले 

निवडणूक आयोग राजकारण्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत! 

प्रकाश आमटे यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर 

बिटकॅाईनमध्ये गुंतवणूक केलेले देशोधडीला लागले, झटक्यात पोहोचला इतक्या रुपयांवर