मा. गो. वैद्य, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई |  जर महाराष्ट्राची 11 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर राज्याचे 3 किंवा 4 भाग होतील. तसेच छोट्या राज्यासाठी केंद्र सरकारनं प्रांत रचना आयोग नेमावा, अशी वादग्रस्त मागणी संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मा.गो.वैद्य कृपया महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नका. महाराष्ट्राचे सामाजिक लचके तुम्ही जन्मापासूनच तोडत आला आहात. आता महाराष्ट्राचे भौगोलिक लचके तोडण्याची भाषा तुम्ही करू नका, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी मा. गो. वैद्य यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.  महाराष्ट्र एक होता एक राहील, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच वैद्य यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोदार टीका करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, राज्याची पूनर्रचना आवश्यक आहे. ज्यात विदर्भ वेगळा होईल. कोणत्या राज्याची लोकसंख्या ही 3 कोटींच्या वर नको आणि एक कोटींपेक्षा कमी नको. म्हणूनच गोवा महाराष्ट्रापासून वेगळं आहे, असंही वैद्य यांनी म्हटलं आहे.